By  
on  

संघर्षाचे दिवस आठवताना अभिनेत्री नोरा फतेहीला अश्रू अनावर, पाहा व्हिडियो

नोरा फतेही हे नाव सध्या लिडींग डान्सर्समध्ये आहे. दिलबर दिलबर’ या गाण्याच्या रिक्रिएटेड व्हर्जनमधील डान्समुळे नोराला खऱ्या अर्थाने यशाची चव चाखता आली. पण यशापर्यंतचा प्रवास अनेक अडथळ्यांचा होता.  परदेशी कलाकारांना बॉलिवूडची दारं लगेच उघडली जातात हा केवळ एक गैरसमज असल्याचं नोराने यावेळी सांगितलं. कॅनडामधून नोरा भारतात आल्यानंतर प्रसिद्धीसाठी तिला जवळपास पाच वर्षं वाट पाहावी लागली.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

 

सुरुवातीला तिला 8-9 मुलींसोबत रुम शेअर करावी लागायची. याशिवाय तिचा पासपोर्टही चोरीला गेला. नोरासाठी हे दिवस खुपच कठीण होते. भारतात आल्यावर तिला सगळ्यात मोठा धक्का बसला. तिला इथल्या सगळ्याच गोष्टी शिकायला खुप वेळ लागला. पण आता नोराच्या गाण्यांनी प्रत्येकाच्या मनात घर केलं असून ज्या यशाची अपेक्षा तिला होती ते मिळालं असं म्हणायला हरकत नाही.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive