शाहिद कपूर साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका?

By  
on  

‘कबीर सिंह’च्या यशानंतर अभिनेता शाहीद कपूर एका मोठ्या हिटच्या शोधात आहे आणि तो त्याला लवकरच गवसेल अशी चिन्ह आहेत. शाहिद पुन्हा एकदा एका ऐतिहासिक सिनेमात महत्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

‘पद्मावत’ या संजय लीला भन्साळी यांच्या बिग बजेट सुपरहिट सिनेमातून शाहिदने महाराज महारावल रतन सिंह ही ऐतिहासिक व्यक्तीरेखा साकारली होती. त्याच्या या भूमिकेला चाहत्यांनी मोठी पसंती दिली. तर एका मिडीया रिपोर्टनुसार शाहिद कपूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एका बिग बजेट सिनेमात महाराजांची भूमिका साकारणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. ‘कबीर सिंह’ सिनेमाचे निर्माते अश्विन वर्दे लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सिनेमावर काम सुरु करणार आहेत. यासाठी त्यांनी साउथ सिनेसृष्टीतील ‘लायका प्रोडक्शन’ या बड्या कंपनीसोबत बोलणी सुरु केलीय. 

 

शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सिनेमाची निर्मिती करण्यासाठी बॉलिवूडमधील अनेकांचं काम सुरु आहे.  यात रितेश देशमुखच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे. रितेश देशमुख महाराज्यांच्या जीवनावर आधारित सिनेमावर काम करत असून यात तो स्वत: महाराजांच्या भूमिकेत झळकणार  असल्याचे बोलले जात आहे. 

त्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या ऐतिहासिक  सिनेमात आता शाहिद झळकणार का? हे लवकरच स्पष्ट होईल.

Recommended

Loading...
Share