By  
on  

पाहा Video : ओटीटीवर अमृता सुभाषचा 'धमाका', टीझर झाला प्रदर्शित

अभिनेत्री अमृता सुभाष ओटीटीवर विविध वेबसिरीज आणि सिनेमांमधून पाहायला मिळतेय. प्रत्येक महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये अमृता तिच्या भूमिकेतील कमाल करताना दिसतेय. त्यातच तिच्या आगामी सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे. 'धमाका' असं या सिनेमाचं नाव असून हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 

या टीझरमध्ये कार्तिक आर्यन एंकरच्या भूमिकेत दिसतोय. जिथे अमृता त्याला ऑर्डर देत असल्याचं पाहायला मिळतय. अमृता त्याला एंकरिंग करण्यासाठी प्रोत्साहित करतेय आणि त्याच्याकडून पुन्हा पुन्हा त्याच्या लाईन्स बोलून घेत आहे. तेव्हा कार्तिकसोबतच अमृताची ही भूमिका नेमकी काय असेल याची उत्सुकता या टीझरमधून ताणली गेली आहे. 

 

तेव्हा ओटीटीवरील इतर सिरीज आणि फिल्मप्रमाणे या सिनेमातील अमृताची भूमिका काय असेल पाहणं औत्सुक्याचं ठरेल.सोशल मिडीयावर कार्तिकसह अमृताने हा टीझर प्रदर्शित झाल्याची घोषणा केली आहे. दिग्दर्शक राम माधवानीचा हा सिनेमा लवकरच नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive