By  
on  

दिग्गज लेखक आणि दिग्दर्शक सागर सरहदी यांचं निधन, 'चांदनी' आणि 'सिलसिला' सिनेमांसाठी केलं होतं लेखन

दिग्गज लेखक आणि फिल्ममेकर सागर सरहदी यांचं निधन झालं आहे. ते 88 वर्षांचे होते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये ते एक उत्तम लेखक म्हणून प्रसिद्ध होते. ते बराच काळापासून आजारी होते. त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांनी जेवणही सोडले होते. सागर सरहदी यांनी मुंबईतील सायन येथील घरी शेवटचा श्वास घेतला. 

सागर सरहदी यांचा जन्म 11 मे 1933 रोजी पाकिस्तानात झाला होता. त्यांचं गाव एबटाबाद सोडून ते दिल्लीतील किंग्सवे कैंप आणि नंतर मुंबईतील चाळीत राहीले. त्यानंतर त्यांनी मेहनतीने फिल्मी दुनियेत करियर बनवलं.

 

सागर सरहदी यांच्या निधनानंतर सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. फिल्ममेकर अशोक पंडित यांनी सोशल मिडीयावर पोस्ट लिहीली आहे की, "हे ऐकून दु:ख झालय की प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक सागर सरहदी यांचं हदयविकाराने निधन झालय. त्याने अनेक सुंदर सिनेमे 'कभी कभी', 'नूरी', 'चांदनी', 'दुसरा आदमी' आणि 'सिलसिला' यांची कहाणी लिहीली. फिल्म इंडस्ट्रीसाठी हे मोठं नुकसान आहे"

 

सागर सरहदी यांचं नाव त्या मोठ्या स्टार्समध्ये सहभागी होतं ज्यांनी स्वत:च्या पायावर उभं राहुन स्वत:चं स्थान निर्माण केलं होतं. सागर यांचं नाव यश चोपडा यांची फिल्म कभी कभी ने मोठं झालं. या सिनेमात रेखा आणि अमिताभ बच्चन एकत्र झळकले होते. सागर यांनी 'नूरी', 'सिलसिला', 'चांदनी', 'रंग' , 'जिंदगी', 'कर्मयोगी', 'कारोबार', 'बाजार' और 'चौसर' यासह अनेक हिट फिल्म्ससाठी स्क्रिप्ट लिहील्या होत्या. फिल्म बाजार या सिनेमातून त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. या सिनेमात स्मिता पाटिल, फारुख शेख आणि नसीरुद्दीन शाह आहेत. 1982 मध्ये रिलीज झालेली ही फिल्म क्लासिक मानली जाते. सागर हे या सिनेमाचे निर्माते, दिग्दर्शक आणि लेखकही होते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jackie Shroff (@apnabhidu)

 

सागर यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी सोशल मिडीयावर श्रद्धांजली वाहिली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive