अंकिता लोखंडे म्हणते, 'सुशांतसोबत लग्न करण्यासाठी मी बाजीराव-मस्तानी आणि शाहरुखसोबतची ऑफर नाकारली होती'

By  
on  

छोट्या पडद्यावरचं प्रसिध्द कपल म्हणून अंकीता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत ओळखले जायचे. पवित्र रिश्ता या मालिकेमुळे या जोडीने रसिक प्रेक्षकांच्या मनामनांत स्थान निर्माण केलं. या दोघांच्या रिलेशनशीपची नेहमीच चर्चा रंगायची. ते जवळपास 6 वर्ष एकमेकांसोबत होते. परंतु 2016 मध्ये या दोघांचं ब्रेकअप झालं. सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिताला अनेकदा चाहत्यांनी विविध कारणांनी ट्रोल केलं आहे. अलिकडेच अंकीताने काही आश्चर्यजनक खुलासे मिडीयासमोर केले आहेत. अंकीताच्या म्हणण्यानुसार तिने सुशांतसाठी काही बॉलिवूडच्या नामांकित ऑफर्सना नकार कळवला. 

एका आघाडीच्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये अंकिता सांगते, 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या फराह खान दिग्दर्शित हॅप्पी न्यू इयर सिनेमासाठी शाहरुख खानच्या अपोझिट मला ड्रिम डेब्यूची संधी देण्यात आली होती. या सिनेमाच्या बातचितीसाठी मी फराह मॅम व शाहरुख सरांची मकाऊमध्ये भेटसुध्दा घेतली होती. पण आतल्या आत मला कुठेतरी असं वाटत होतं की, माझ्या पार्टनरचं चांगलं व्हावं.

अंकिता पुढे सांगते, तिने संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'बाजीराव मस्तानी' आणि 'गोलियों की रासलीला: राम लीला' या दोन्ही सिनेमांना लग्नासाठी नकार कळवला होता. ती म्हणते आजही मला आठवतंय, जेव्हा संजय सरांनी मला बोलावून सांगितलं होतं, की बाजीराव मस्तानी सिनेमा कर नाहीतर कधीतरी तुला पश्चाताप होईल. पण मी मग मी त्यांना सांगितलं नाही सर मला लग्न करायचंय. त्यापुढे ते काहीच बोलू शकले नाहीत. 

Recommended

Loading...
Share