पाहा Video : या दिग्गज अभिनेत्रींसोबत माधुरीचा खास परफॉर्मन्स, लीजेंड्री अभिनेत्रींसोबत माधुरीच्या अदा

By  
on  

बॉलीवुडमध्ये अनेक अदाकारांनी आपली एक वेगळी छाप सोडली आहे. आजही या अदाकारांची जादू कायम आहे. त्यापैकी हेलन, वहीदा रहमान, आशा पारेख या अभिनेत्री. या अभिनेत्रींच्या अभिनयानं आणि विशेषकरून नृत्यकौशल्याने त्या काळी प्रेक्षकांना चकीत केलं होतं. या दिग्गज अभिनेत्रींनी नृत्यकौशल्याने तो काळ गाजवला होता. याच आठवणी जाग्या करण्यासाठी या अभिनेत्री पोहोचल्या डान्स दिवाने 3 या रिएलिटी शोच्या मंचावर.

धकधक गर्ल माधुरी दीक्षित नेने परिक्षक असलेल्या या कार्यक्रमात या दिग्गज अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. एकीकडे माधुरीचा डान्स आणि अदा त्यातच या तीन दिग्गज अभिनेत्रींची हजेरी असताना डान्स धमाका तर होणारच. माधुरीने या तिन्ही अभिनेत्रींसोबत काही खास व्हिडीओ केले आहेत. माधुरीने हे व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. सुरुवातीला माधुरीने दिग्गज अभिनेत्री वहीदा रहमान यांच्यासोबतचा एक व्हिडीओ शेयर केला आहे. 'पान खाए सय्या हमारो' वहिदा यांच्या या प्रसिद्ध गाण्यावर माधुरीने त्यांच्यासोबत हा व्हिडीओ केला आहे. एकीकडे वहीदा यांच्या अदा तर माधुरीचे एक्सप्रेशन यांनी हा व्हिडीओ कमाल वाटतोय. या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव होताना दिसत आहे. 

 

त्यानंतर माधुरीने दिग्गज अदाकार हेलन यांच्यासोबतचा व्हिडीओ पोस्ट केला. हेलन यांचं प्रसिद्ध गाणं 'मुंगडा' या गाण्यावर माधुरी आणि हेलन यांच्या अदा या व्हिडीओत पाहायला मिळत आहेत. 

 

तर दिग्गज अभिनेत्री आणि नृत्यांगना आशा पारेख यांच्यासोबतही माधुरीने व्हिडीओ केला आहे. आशा पारेख यांच्यासोबत 'अच्छा तो हम चलते है' या गाण्यावर माधुरी आणि आशा पारेख यांच्या अदा पाहायला मिळाल्या.

 

हे व्हिडीओ पाहुन आता या विशेष भागाची उत्सुकता लागून राहिली आहे. तेव्हा या व्हिडीओप्रमाणे 'डान्स दिवाने'च्या मंचावर या दिग्गज अभिनेत्रींच्या हजेरीने धमाल येणार एवढं नक्की.

Recommended

Loading...
Share