.jpg)
पीपिंगमूनने अलीकडेच चाहत्यांना माहिती दिली होती की, धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओलचा धाकटा मुलगा राजवीर देओल लवकरच बॉलिवूड डेब्यु करणार आहे. राजवीर सलमान खानची भाची अलीजेह अग्निहोत्री हिच्या सह रॉमकॉममध्ये दिसणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अविनाश बडजात्या दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. धर्मेंद्र यांनी पोस्ट शेअर करत राजवीरच्या डेब्युची माहिती दिली आहे.
आपल्या पोस्टमध्ये धर्मेंद्र म्हणतात, ‘ माझा नातू राजवीर अविनाश बडजात्यासोबत दिग्दर्शनात पाऊल ठेवतो आहे. माझ्यावर प्रेम केलं तितकंच या दोन्ही मुलांवर कराल अशी अपेक्षा आहे. राजवीरचा मोठा भाऊ करण याने ‘पल पल दिल के पास’ या सिनेमातून डेब्यु केलं आहे.