माधुरीने केलं खास कँडल लाईट डिनर, मालदीवमध्ये फॅमिलीसोबत लुटतेय सुट्टीची मजा

By  
on  

कामातून थोडासा ब्रेक घेऊन सुट्टीची मजा लुटत प्रवास किंवा भटकंती करायला अनेकांना आवडतं. अभिनेत्री माधुरी दीक्षितनेही सध्या असच केलं आहे.  धकधक गर्ल माधुरी दीक्षित नेने सध्या मालदीवमध्ये आहे. माधुरी मालदीवमध्ये परिवारासोबत सुट्टीची मजा लुटतेय. पति श्रीराम नेने आणि दोन मुलांसोबत मालदीवमधील निसर्गरम्य वातावरण आणि समुद्रकिनारी मजा करत आहे. माधुरीने सोशल मिडीयावर या ट्रीपचे काही फोटो आणि व्हिडीओ शेयर केले आहेत.

 

एका फोटोमध्ये माधुरीने पति श्रीराम नेने यांच्यासोबतच्या खास कँडल लाईट डिनरचा फोटो शेयर केला आहे. हे कपल या फोटोत अगदी मेड फॉर इच अदर असचं दिसतय. 

 

याशिवाय माधुरीने नुकताच एक व्हिडीओ देखील शेयर केला आहे. या व्हिडीओत माधुरी, पति श्रीरामनेने आपल्या मुलासोबत वॉटर स्पोर्टची मजा लुटताना दिसत आहेत. परिवारासोबत या सुट्टीची मजा घेण्याचा आनंद माधुरीच्या चेहऱ्यावर झळकतोय. माधुरीच्या चाहत्यांना या खास ट्रीपच्या अपडेट्स सोशल मिडीयावरील पोस्ट मधून पाहायला मिळत आहेत. 

 

Recommended

Loading...
Share