पुन्हा माधुरी दीक्षितचं 'एक दो तीन..' बऱ्याच वर्षांनी 'तेजाब'च्या या गाण्यावर थिरकली धकधक गर्ल

By  
on  

'डान्स दिवाने' या डान्स रिएलिटी कार्यक्रमाचं वैशिष्ट म्हणजे या कार्यक्रमात विविध नृत्यकौशल्य असलेले स्पर्धक आणि त्यांचे परफॉर्मन्स पाहायला मिळतात. यासोबत या कार्यक्रमाची परिक्षक माधुरी दीक्षित नेने या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण असते. या कार्यक्रमात येणारे पाहुणे, त्यांचा माधुरीसोबतचा डान्स सगळ्यांचं लक्ष वेधतं.

माधुरी सोशल मिडीयावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. या कार्यक्रमाच्या सेटवरील विविध फोटो, व्हिडीओही माधुरी शेयर करते. माधुरीने नुकताच एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत माधुरी प्रसद्धि डान्सर शक्तीसोबत डान्स करताना दिसतेय. ज्या गाण्यावर माधुरी डान्स करतेय ते गाणं माधुरीच्या प्रसिद्ध सिनेमातील गाजलेलं गाणं आहे. 

 

'तेजाब' या माधुरीच्या गाजलेल्या सिनेमातील 'एक दो तीन हे' माधुरीचं गाजलेलं गाणं. हे गाणं आणि त्याच्या डान्स स्टेप्स प्रचंड प्रसिद्ध झाल्या होत्या. या गाण्याची जादू आजही कायम आहे. मात्र जेव्हा माधुरी या गाण्यावर पुन्हा थिरकते तेव्हा एक वेगळीच अदा आणि जादू पाहायला मिळते. या व्हिडीओतही माधुरीला या गाण्यावर नृत्य सादर करताना पाहुन कमाल वाटतं. या गाण्याचं त्या काळात वेगळचं क्रेज होतं. आणि आजही माधुरी या गाण्यावर थिरकली की ती सगळ्यांचं लक्ष वेधते. 

म्हणूनच चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी या व्हिडीओला पसंती दिली आहे. माधुरीच्या या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाले आहेत.

Recommended

Loading...
Share