By  
on  

या सिनेमात शरद केळकर दिसणार सोलो लीडमध्ये, सिनेमात झळकणार फक्त एकच पात्र

2020 हे वर्ष अभिनेता शरद केळकरसाठी खास ठरलं. तान्हाजी आणि लक्ष्मी या सिनेमांमधून शरदने प्रेक्षकांची मनं जिंकली. एकीकडे तान्हाजी सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका तर दुसरीकडे लक्ष्मी सिनेमा एका तृतीयपंथीच्या भूमिकेत शरद झळकला. या दोन्ही भूमिकांसाठी शरदचं भरपुर कौतुक झालं. मात्र आता आगाणी सिनेमात शरद सोलो लीडमध्ये झळकणार आहे.

याविषयी सूत्रांकडून अशी माहिती मिळतेय की, "शरद हाच या सिनेमात मुख्य पात्र असेल आणि इतर पात्रांचा फक्त आवाज असणार आहे. हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होईल. जो या वर्षांच्या शेवटी येईल."

या सिनेमासाठी शरद केळकर प्रचंड उत्सुक आहे. शरद याविषयी सांगतो की, "माझा आगामी सिनेमा देजा वू, हा माझ्यासाठी खास आहे. ही भारतीय सिनेमाच्या इतिहासातील पहिली अशी फिचर फिल्म असेल ज्यात एक पात्र एकाच जागी असेल आणि बाकी पात्रांचे फक्त आवाज असतील. अभिजीत वारंग यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांचा हा डेब्यू सिनेमा पिकासोला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मला या सिनेमाचं शूटींग करायला प्रचंड आवडलं आणि आता प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे."

 तेव्हा शरद केळकरच्या या हटके सिनेमाची उत्सुकता आता सगळ्यांनाच असेल यात शंका नाही. 

Recommended

PeepingMoon Exclusive