By  
on  

‘रामसेतू’चे 45 क्रु मेंबर करोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी निर्मात्यांनी फेटाळली

अलीकडेच अभिनेता अक्षय कुमारने त्याला करोनाची लागण झाल्याची माहिती सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली होती. त्यानंतर ‘राम सेतु’च्या सेटवर 45 जणांना करोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर  आलं होतं. हे वृत सिनेमाचे निर्माते विक्रम मल्होत्रा यांनी फेटाळलं आहे.

 

मल्होत्रा यांनी क्रु मेंबर्सची चाचणी स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर माध्यमातून केली गेली असल्याचं बोललं जात आहे. 3 एप्रिलला टेस्टींग कॅम्पमध्ये 190 लोकांची टेस्ट केली गेली होती. यामध्ये पॉझिटिव्ह आलेल्या 25 लोकांना टीमधून बाजूला केलं गेलं. अक्षयचा या 45 लोकांशी काहीच संबंध नसल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive