फिल्ममेकर संतोष गुप्ता यांच्या पत्नी आणि मुलीची आत्महत्या

By  
on  

फिल्ममेकर संतोष गुप्ता यांची पत्नी अस्मिता आणि मुलगी सृष्टी यांनी आत्मदहन करुन आत्महत्या केली आहे. अस्मिता या किडनीच्या विकाराने खुप दिवसांपासून ग्रस्त असल्याचं बोललं जात आहे. अस्मिता यांच्यामुळेच सृष्टीनेही आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. 

यावेळी दोन वेगवेगळे रिपोर्ट फाईल केल्याचं वरिष्ठ निरिक्षक भरत गायकवाड यांनी सांगितलं आहे. रिपोर्टसनुसार माय-लेकीने सोमवारी दुपारी अंधेरी वेस्टच्या के डी एन नगरच्या अपार्टमेंटमध्ये आत्मदाह केला. हा प्रकार त्यावेळी समोर आला ज्यावेळी शेजा-यांनी अग्निशमन विभागाला याची माहिती दिली. कुपर हॉस्पिटलमध्ये अस्मिताला मृत घोषित केलं. तर 70 % टक्के जळालेल्या सृष्टीने दुस-या दिवशी प्राण सोडला.

Recommended

Loading...
Share