By  
on  

युजरने अभिषेक बच्चनच्या अ‍ॅक्टींगला म्हणलं ‘थर्ड क्लास’, अभिषेकने दिलं हे उत्तर

कलाकारांना सोशल मिडियावर कौतुकासोबतच ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. अभिषेक बच्चनलाही अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण अनेकदा तो उत्तराने नेटिझन्सचं मन जिंकून घेतो. शेअर मार्केटवरील घडामोडीवर पुन्हा एकदा ‘बिग बुल’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘अभिषेक बच्चन ‘बिग बुल’मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. 

 

 

एका यूजरने ‘द बिग बुल’ सिनेमासंदर्भात ट्वीट करत अभिषेकला ट्रोल केलं. ‘नेहमी प्रमाणे अभिषेक बच्चनने आपल्या थर्डक्साल अभिनयाने सर्वांना नाराज केलेले नाही. अतिशय घाणेरडी स्क्रिप्ट आणि चित्रपट. स्कॅम १९९२ खूप वेगळा होता’ असं ट्वीट या युजरने केलं. यावर अभिषेकने नेहमीच्याच शांत अंदाजात उत्तर दिलं आहे. मी तुम्हाला निराश केले नाही हे ऐकून मला फार आनंद झाला. माझा चित्रपट पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. १९९२ मध्ये भारतीय शेअर बाजारात झालेल्या मोठ्या स्कॅममधील आरोपी हर्षद मेहता यांच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतला आहे.

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive