By  
on  

कन्नड बिग बॉस 7 ची स्पर्धक चैत्रा कोटूरने केला आत्महत्येचा प्रयत्न

कन्नड बिग बॉस 7 ची स्पर्धक आणि अभिनेत्री चैत्रा कोटूरने गुरुवारी आपल्या घरी फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला हॉस्पिटल्मध्ये दाखल करण्यात आलं. आता तिची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. काही दिवसापुर्वीच तिने मांड्या येथील व्यावसायिक नागारर्जुंन सोबत लग्नगाठ बांधली होती.

 

लग्न झाल्यावर नागार्जुनचे कुटुंब तिला सून म्हणून स्वीकारण्यास तयार नव्हते. याशिवाय ते नागार्जुनवरही तिच्याशी लग्न न करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोपही चैत्राने केला आहे.  पण चैत्रा यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने आणि काहींनी मित्रमंडळींच्या उपस्थितीत त्यांचे लग्न पार पडलं होतं. 28 मार्च रोजी चैत्रा आणि नागार्जुनच्या लग्नाची काही फोटो व्हायरल झाले होते. चैत्राने कन्नडच्या ‘बिग बॉस 7’मध्ये भाग घेतला होता, ज्याचे सूत्रसंचालन किचा सुदीप याने केले होते

Recommended

PeepingMoon Exclusive