पाहा Video : पति श्रीराम नेने यांनी माधुरीसाठी केला खास पिझ्झाचा बेत

By  
on  

माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने ही जोडपं अनेकांचं आवडतं जोडपं आहे. त्यांच्यातली खऱ्या आयुष्यातील केमिस्ट्री सगळ्यांचं लक्ष वेधते. दोघही सोशल मिडीयावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. माधुरीने स्वत:चं युट्यूब चॅनेलही सुर केलं, तर पति श्रीराम नेने यांचही आता युट्यूब चॅनेल आहे. या चॅनेलवर या गोड कपलच्या खऱ्या आयुष्यातील विविध गोष्टी पाहायला मिळतात. नुकताच एक नवा व्हिडीओ आता समोर आलाय.

 

या नव्या व्हिडीओत श्रीराम नेने घरात पिझ्झा बनवताना दिसत आहेत. नेने यांनी दोन प्रकारचे पिझ्झा घरातच बनवले आहेत. ही माधुरी दीक्षितसाठी खास पिझ्झा ट्रीट होती. पिझ्झा तयार होताच माधुरीने किचनमध्ये एन्ट्री घेतली आणि पिझ्झावर ताव मारला. श्रीराम नेने यांनी बनवलेला हा पिझ्झा माधुरीला प्रचंड आवडला असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतय. 

तेव्हा पतिने बनवलेला पिझ्झा माधुरीने चिट डेसाठी खाल्ला आहे. माधुरी आणि श्रीराम नेने दोघं मिळून त्यांच्या किचनमध्ये विविध पदार्थ बनवताना दिसतात. माधुरी काही महाराष्ट्रीयन पदार्थ बनवून नेने यांना खाऊ घालते तर कधी श्रीराम नेने किचनमध्ये काही स्पेशल पदार्थ बनवून माधुरीला इम्प्रेस करताना दिसतात.

Recommended

Loading...
Share