‘चुपके चुपके’मधील ते घर कसं बनलं आजचं ‘जलसा’, अमिताभ यांनी शेअर केली आठवण

By  
on  

बिग बी सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट असतात. आपल्या पोस्टमधून काही आठवणीही ते शेअर करत असतात. आताही त्यांनी अशीच खास आठवण शेअर केली आहे. अमिताभ यांनी काही फोटो शेअर केले आहेत. याच्या कॅप्शनमध्ये चुपके चुपके’ सिनेमाला  ४६ वर्षे पूर्ण झाल्याचं  म्हटलं आहे. या फोटोंच्या पार्श्वभूमीवर ‘जलसा’ हा बंगला दिसत आहे.

 

 

या आलिशान बंगल्यामध्ये अनेक सुपरहिट  सिनेमांचं शुटिंग झालं आहे. हे देखील ते सांगतात. ‘चुपके चुपके, ऋषिकेश मुखर्जी यांच्यासोबत केलेल्या या सिनेमाला आज ४६ वर्षे पूर्ण झाली. या फोटोमधील घर निर्माते एनसी सिप्पी यांचं होतं. मी ते खरेदी केलं होतं पण नंतर विकले. काही दिवसांनंतर ते घर मी पुन्हा खरेदी केलं. घरामध्ये थोडे फार बदल केलं. आता हे घर जलसा आहे. येथे अनेक सिनेमांचं शुटिंग झालं आहे. आनंद, नमकहराम, चुपके चुपके, सत्ते पे सत्ता आणि इतर बरेच सिनेमांचं या बंगल्यात शुटिंग झालं आहे. अमिताभ आगामी ‘चेहरे’सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

Loading...
Share