By  
on  

संगीतकार बप्पी लहरी यांची कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

सध्या कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहायला मिळतोय. यातच कोविड 19 पॉजिटिव रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. मनोरंजन विश्वातील कलाकारही कोविडच्या विळख्यात सापडले आहेत. अनेक कलाकार कोविड पॉजिटिव आल्याचं समोर येतय. प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी यांचीही कोरोना चाचणी पॉजिटिव आली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता 2 आठवड्यानंतर बप्पी यांनी कोविडवर मात केली आहे.

बप्पी यांना उपचारासाठी मुंबईच्या ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बप्पी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. बप्पी हे आय सी यूमध्ये होते. मात्र या कोरोनातून ते बरे झाले आहेत. एवढच नाही तर त्यांना रुग्णालयातूनही डिस्चार्ज मिळाला आहे. बप्पी लहरी आता त्यांच्या घरी परतले आहेत. नुकतच सोशल मिडीयावर त्यांनी फोटोसह एक पोस्ट शेयर केली आहे.

 

ते लिहीतात की, "सगळ्यांच्या आशिर्वादाने आणि प्रियजनांमुळे मी घरी परतलो आहे. ब्रीच कैंडीमधील डॉक्टर, नर्सेस आणि स्टाफचे विशेष आभार. तुमच्य़ा शुभेच्या आणि आशिर्वादासाठी धन्यवाद."  या फोटोत बप्पी दा यांचे वजन कमी झाल्याचे पाहायला मिळतय. मात्र ते ठणठणीत होऊन बरे झाल्याचही पाहायला मिळतय. या फोटोत बप्पी दा यांनी नेहमीप्रमाणे त्यांचा खास लुक केला आहे. 

 31 मार्च रोजी बप्पी यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यांच्या प्रवक्ताने अधीक माहिती दिली होती. बप्पी यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंना कोरोना चाचणी करण्याविषयी प्रवक्ताने दिलेल्या स्टेटमेंटमध्ये लिहीण्यात आलं होतं.

Recommended

PeepingMoon Exclusive