By  
on  

दीपिका पदुकोणने दिला MAMI च्या अध्यक्षपदाचा राजीनामा

दीपिका पदुकोणने नुकतीच चाहत्यांशी एक महत्त्वाची बातमी शेअर केली आहे. दीपिकाने मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेज म्हणजे MAMI या संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. कामामधून या जबाबदारीकडे वेळ देण्यास जमत नसल्याने तिने हा राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. 

 

यावेळी आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते, ‘या संघटनेच्या संचालक मंडळात अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडणं या अनुभवाने खुप काही शिकवलं. कलाकार म्हणून जगभरातून उत्तमोत्तमकलावंतांना मुंबईमध्ये केंद्रित करणं हे खूप जबाबदारीचं काम होतं. पण मला असं लक्षात आलं आहे की, माझ्या कामाचं सध्याचं नियोजन पाहता मला वाटत नाही की मी MAMI च्या कामाकडे आवश्यक तेवढं लक्ष देऊ शकेन. मला आशा आहे की ही संघटना योग्य हातात सोपवली जावी. माझे या संघटनेशी असलेले माझं नातं शेवटपर्यंत कायम राहील. दीपिकाने २०१९ साली MAMIच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती.

Recommended

PeepingMoon Exclusive