By  
on  

पाहा Video : माधुरीच्या 'एक दोन तीन' गाण्यावर माधुरीसोबत थिरकली ही अभिनेत्री

धकधक गर्ल माधुरीची अभिनेत्रीसोबतच एक उत्तम नृत्यांगना म्हणूनही ओळख आहे. तर आणखी एक अभिनेत्री तिच्या नृत्याने बॉलीवुड गाजवतेय. ती अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणजे नोरा फतेही. अभिनयात तिला तितकी प्रसिद्धी मिळाली नसली तरी तिच्या नृत्याने आणि अदांनी ती प्रेक्षकांची मनं जिंकतेय. मात्र जेव्हा या दोन अभिनेत्री एकत्र थिरकतात तेव्हा एक जादुई परफॉर्मन्स पाहायला मिळतो.

'डान्स दिवाने' या डान्स रिएलिटी कार्यक्रमाच्या मंचावर नुकतीच नोराने पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. आता नोरा या कार्यक्रमात येणार म्हटल्यावर डान्स मस्ती तर होणारच. नोराने या मंचावर सुंदर नृत्य सादर केलं. एवढच नाही तर ऑफस्क्रिनही ती माधुरीसोबत थिरकताना दिसली. माधुरीने नोरासोबतची काही व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केले आहेत.

 

या व्हिडीओत माधुरी नोराच्या प्रसिद्ध गाण्यांवर तिच्यासोबत थिरकताना दिसली. तर माधुरीच्या प्रसिद्ध गाण्यांवर नोरा माधुरीसोबत थिरकली. यात मग एक दोन तीन या गाण्यावरही माधुरीने नोरासोबत ठेका धरला. नोरानेही माधुरीच्या स्टेप्स हुबेहुबे सादर केल्या. हे व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive