By  
on  

मिलिंद सोमणच्या लग्नाला पूर्ण झाली 3 वर्षे, दोघांच्या वयात आहे 25 वर्षांचं अंतर

अभिनेता आणि फिटनेस फ्रिक मिलिंद सोमण हा कायम चर्चेत असतो. कधी त्याच्या रिलेशशीप, लग्न तर कधी त्याच्या फिटनेससाठी. तीन वर्षांपूर्वी मिलिंद असाच पुन्हा चर्चेत आला होता. ते म्हणजे त्याच्या रिलेशनशीप आणि लग्नामुळे. मिलिंदने तीन वर्षांपूर्वी अंकिता कोंवरसोबत लग्न केलं होतं. अंकिता ही मिलिंद सोमणं पेक्षा वयाने 25 वर्षांनी लहान आहे. दोघांमधील वयात असलेलं अंतर जास्त असल्यानं दोघांचं रिलेशनशीप चर्चेत आलं होतं.

2018 मध्ये मिलिंद आणि अंकिताने लगीनगाठ बांधली होती. तेव्हा या लग्नाची चर्चा झाली होती. नुकतीच दोघांच्या लग्नाल 3 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने मिलिंद सोमणने खास पोस्ट सोशल मिडीयावर शेयर केली आहे. तो लिहीतो की, "3 वर्षे. लग्नाच्या वाढदिवसांच्या शुभेच्छा अंकिता. अजूनही हे कालच झालं असं वाटतय. हेच ते हास्य ज्याने माझं ह्रदय उबदार बनवतं. ही स्वीट हार्ट जिच्यामुळे मी हसतो."

 

मिलिंद सोमणला फिटनेसची प्रचंड आवड आहे. भारताचा आयरन मॅन म्हणून त्याची ओळख आहे. मिलिंद दररोज धावतो आणि लांबच लांब धावत अनवाणी प्रवास करतो. मिलिंससोबतच त्याची आई देखील धावते आणि फिटनेसची काळजी घेते. मिलिंदची पत्नी अंकिताला देखील फिटनेसची आवड आहे. अनेकदा ती मिलिंद सोबत धावताना दिसते. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive