By  
on  

रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनीही घेतली कोरोना प्रतिबंधक लस

 देशभरात कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. राज्यासह देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातलय. याच कोरोनाला प्रतिबंधक असलेली लस आता नागरीक घेत आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी ही लस घेण्याचं आवाहन अनेक जण करत आहेत. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी ही लस घेतली आहे. लस घेतल्यानंतर सोशल मिडीयावर फोटो शेयर करून इतरांनाही लस घेण्याचं आवाहन ते करत आहेत.

अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया देशमुख यांनीही नुकतीच ही कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. सोशल मिडीयावर दोघांनी लस घेतानाचे फोटो शेयर केले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

 

या पोस्टमधून ते सांगातात की, "लसीकरण करा, या राक्षसाशी एकत्र येऊन लढा देऊयात."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

 

यासह अनेक कलाकारांनी सोशल मिडीयावर त्यांच्या लसीकरणाचे फोटो शेयर करत कोरोनापासून बचावर करण्यासाठी लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive