By  
on  

ब्रेकनंतर माधुरी दीक्षित पुन्हा परतली डान्स दिवानेच्या सेटवर, शेअर केला हा फोटो

काही दिवसांपुर्वीच माधुरीने करोनाचा दुसरा डोस घेतला होता. यानंतर माधुरी ‘डान्स दिवाने 3’ या शोपासून काही काळ लांब राहणार असल्याचं समोर आलं होतं. माधुरीने शो पासून दोन आठवड्यांचा ब्रेक घेतला होता. डान्स दिवाने 3 ची सगळी टीम शुटिंगसाठी बंगलुरुला रवाना झाली आहे. 

 

 

माधुरीच्या अनुपस्थितीमध्ये तिची जागा नोरा फातेहीने घेतली होती. मार्चमध्ये या शो चे परिक्षक धर्मेश यांनाही करोनाची लागण झाली होती. माधुरीने पुन्हा सेटवर आगमन केलं आहे. ग्रे कलरच्या साडीतील फोटो शेअर करत तिने बॅक ऑन सेट असं कॅप्शन दिलं आहे. माधुरीच्या चाहत्यांना तिला पुन्हा शोमध्ये पाहून नक्कीच आनंद होईल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive