By  
on  

'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांच्या निधनाच्या होत्या अफवा, फेसबूक व्हिडीओमधून चर्चांना दिलं पूर्णविराम

टेलिव्हिजन दुनियेत 'महाभारत' मधील 'भीष्म पितामह' आणि 'शक्तिमान' अशा या दोन्ही भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते मुकेश खन्ना यांचं निधन झाल्याची अफवा सोशल मिडीयावर पसरली होती. त्यांचं कोरोनाने निधन झाल्याचही बोललं गेलं. मात्र या अफवांना आता स्वत: मुकेश खन्ना यांनी पूर्ण विराम दिलाय. त्यांनी फेसबूक या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेयर करून या चर्चांना पूर्णविराम दिलय. 

मुकेश खन्ना यांची प्रकृती ठीक असल्याचं ते स्वत: या व्हिडीओत सांगत आहेत. चूकीच्या बातम्या पसरवणाऱ्यांना त्यांनी या व्हिडीओतून फटकार लगावली आहे. ते या पोस्टमध्ये लिहीतात की, "तुमच्या आशीर्वादामुले मी पूर्णपणे स्वस्थ आणि सुरक्षित आहे. मला कोविड 19 नाही झालय आणि मी रुग्णालयातही नाहीय. मला नाही माहिती की ही अफवा कुणी पसरवली आणि मला हेही माहिती नाही की अशा अफवा पसरवणाऱ्यांचा उद्देश काय आहे. ते अशा खोट्या बातम्यांमधून लोकांच्या भावनांशी खेळतात."

 

या व्हिडीओमधून त्यांनी स्पष्ट केलय की त्यांना कोरोना झाला नसून त्यांची प्रकृती चांगली आहे. शिवाय अशा अफवा पसरवणाऱ्यांवर रागही व्यक्त केला आहे. ते सांगतात की, "मानसिकदृष्या अस्थिर असलेल्या अशा लोकांसाठी काय उपचार असायला हवा ? त्यांच्या कृत्याची शिक्षा त्यांना कोण देणार ? आता खूप झाले. अशाप्रकारच्या खोट्या बातम्यांवर आळा घातलाच पाहिजे."

स्वत:च्या निधनाच्या अफवा ऐकून मुकेश खन्ना यांना प्रचंड राग आला असून त्यांनी या व्हिडीओतून व्यक्त केला आहे. सोशल मिडीयामुळे अशाप्रकारच्या बातम्या पसरल्या जात असल्याचही ते सांगतात.

Recommended

PeepingMoon Exclusive