By  
on  

दिग्दर्शक समीर विद्वांस करणार कार्तिक आर्यनच्या आगामी सिनेमाचं दिग्दर्शन ? साजीद नाडियाडवालाची असेल निर्मिती

बॉलीवुड अभिनेता कार्तिक आर्यनच्या समोर आता काही मनोरंजक प्रोजेक्ट्स येत असल्याचं चित्र पाहायला मिळतय. मिळालेल्या वेळेत कार्तिक सध्या विविध स्क्रिप्ट वाचतोय. सूत्रांच्या माहितीनुसार कार्तिक हा साजिद नाडियाडवाला यांचयासोबत एका लव्ह स्टोरी सिनेमासाठी टीम करणार असल्याचं बोललं जातय. एका प्रसिद्ध वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार हा सिनेमा राष्ट्रीय पुरस्कार विजेते समीर विद्वांस दिग्दर्शिक करणार असल्याचं समोर आलं आहे. समीर यांनी अनेक मराठी सिनेमांचं दिग्दर्शक केलं आहे. आनंदी गोपाळ या त्यांच्या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कारासह विविध पुरस्कार मिळाले होते. यात अशीही माहिती नमूद करण्यात आलीय की या सिनेमाचं चित्रीकरण या वर्षाच्या शेवटाला सुरु होणार आहे. 

 सूत्र सांगतात की, "साजिद नाडियाडवाला कार्तिक आर्यनसोबत टीमअपसाठी चर्चा करुत असून त्यांना स्क्रिप्टही मिळाली आहे ज्याने हे परफेक्ट टीमअप सिद्ध होईल. ही एक अविस्मरणीय प्रेमकथा आहे ज्यात कार्तिक वेगळ्या अंदाजात दिसेल. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक समीर विद्वांस रोमँटिक जॉनरमध्ये एक वेगळं चित्र निर्माण करण्याच्या तयारीत आहेत. सिनेमाची टीम हा सिनेमा चित्रीत करण्यासाठी उत्सुक आहेत."

सूत्रांनी असही नमूद केलय की कोरोना रुग्णांची संख्या कमी होताच याविषयीची घोषणा करण्यात येणार आहे. सूत्र सांगतात की "टीम ही शांतपणे या सिनेमाच्या तयारीची कामं करत आहे. पण अधिकृत घोषणा ही कोरोनाचं संक्रमण कमी झाल्यावर करण्यात येईल. कार्तिक सुद्धा साजिद नाडियाडवाला सारख्या निर्मात्यांसोबत पहिल्यांदाच टीमअप करण्यासाठी उत्सुक आहे."

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive