By  
on  

करोना पिडितांसाठी अनुराधा पौडवाल यांनी डोनेट केले 15 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स

करोनामुळे बळी जाणा-यांचं सत्र थांबताना दिसत नाहीये. देशभरात करोनाच्या बातम्या सुन्न करणा-या आहेत. अनेक लोक करोनाला बळी पडताना दिसत आहेत. एकीकडे लस आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. अनेक सेलिब्रिटी करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. 

गायिका अनुराधा पौडवाल यांनीही करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. अनुराधा यांनी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रमध्ये 15 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स दान केले आहेत. 9 मे या अरुण पौडवाल यांच्य जयंतीचं औचित्य साधत त्यांनी हा निर्णय घेतला. 
एका कार्यक्रमाचं मानधन घेण्याऐवजी त्यांनी आयोजकांना करोनाग्रस्तांची मदत करण्यास सांगितलं आहे. अनुराधा यांनी यापुर्वीही नांदेडच्या 10 गावांना दत्तक घेतलं होतं. लोकांना ऑक्सिजन अभावी प्राण सोडताना पाहणं हे त्रासदायक आहे. त्यामुळे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्सदेण्याचा निर्णय घेतल्याचं अनुराधा पौडवाल यांनी सांगितलं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive