By  
on  

‘तारक मेहता’ मधील बबितावर याकारणासाठी झाला गुन्हा दाखल

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम बबीता म्हणजेच अभिनेत्री मुमुन दत्ताच्या अडचणींमध्ये वाढच होताना दिसते आहे. काही दिवसांपुर्वी एका व्हिडियोमध्ये मुनमुनने जातीवाचक शब्दाचा प्रयोग केला आहे. त्यावरुन नेटिझन्सनी तिच्या अटकेची मागणी केली होती. पण आता मुनमुनची अडचण वाढली आहे. हरियाणामधील हांसी शरहात मुनमुनविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

नॅशनल अलायंल फॉर दलित ह्यूमन राईटस् चे कार्यकर्ते रतज कलसन यांनी मुनमुन विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत मुनमुनवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याने तिच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. 
मुनमुनने या व्हिडियोमध्ये मी लवकरच यूट्यूबर दिसणार आहे. त्यासाठी मला सुंदर दिसायचं आहे. मला ** सारखं दिसायचे नाही’. अशाप्रकारे जातीवाचक शब्द वापरला होता.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive