By  
on  

अभिनेता परेश रावल यांनी निधनाच्या अफवेवर केला खुलासा

सोशल मिडियावर कधी कोणती अफवा व्हायरल होईल याचा नेम नाही. अनेकदा सेलिब्रिटींच्या मृत्यूच्या अफवाही समोर येताना दिसतात. अलीकडेच लकी अली, मीनाक्षी शेषाद्री, मुकेश खन्ना यांच्या मृत्यूच्या अफवा समोर येताना दिसत होत्या. आता दिग्गज अभिनेते परेश रावल यांच्या निधनाच्या अफवा सोशल मिडियावर ट्रेंड करु लागल्य. दरम्यान, आता स्वत: परेश रावल यांनी पोस्ट शेअर करत या अफवांना पूर्ण विराम दिला आहे.

 

 

परेश आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘मी सकाळी ७ वाजता झोपलो या गैरसमजांबद्दल क्षमस्व …!’ यासोबतच त्यांनी त्या पोस्टच्या स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. या पोस्टमध्ये  ‘सांगताना अत्यंत दु:ख होतं आहे की परेश रावल जी आता आपल्यासोबत नाही.’ हे लिहिलं होतं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive