By  
on  

या अभिनेत्याकडून माधुरी दीक्षितला मिळाल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणतो "माधुरीसोबत काम करून स्वप्न पूर्ण झालं"

धकधक गर्ल, मोहिनी अशी ओळख असलेली बॉलीवुडची सौंदर्यवती माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस. निखळ हास्य, सौंदर्य, नृत्यकौशल्याने तिने मागील कित्येक वर्षे हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवलय. याच माधुरीवर वाढदिवसानिमित्ताने आज शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

चाहत्यांसह मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी माधुरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मिडीयावर अनेकांनी माधुरीसोबतचे फोटो शेयर करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता रितेश देशमुखही माधुरीचा मोठा चाहता आहे. त्यानेही माधुरीसोबतचे काही फोटो शेयर करून माधुरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

 

'टोटल धमाल' या चित्रपटाच्या निमित्ताने रितेश देशमुखने माधुरीसोबत काम केलं होतं. या चित्रपटामुळे रितेशचं माधुरीसोबत काम करण्याचं स्वप्न पूर्ण झाल्याचं तो नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये म्हणतोय. 

रितेश लिहीतो की, "सगळ्यात सुंदर माधुरी मॅमला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमच्यासोबत काम करून माझं स्वप्न पूर्ण झालं. तुम्हाला आनंद, प्रेम, उत्तम आरोग्यच्या शुभेच्छा देतो. देव तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो आणि माझ्यासोबत पुन्हा काम करण्याची तुमची इच्छा लवकरच पूर्ण होऊ देत. तुमचा दिवस चांगला जाऊ देत."

Author

Recommended

PeepingMoon Exclusive