By  
on  

सासऱ्यांच्या आठवणीत जेनेलिया देशमुखची भावुक पोस्ट, जयंती निमित्त शेयर केला लग्नातला फोटो

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज 76 वी जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्ताने अनेकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. मात्र देशमुखांची सून जेनेलियाची भावुक सोशल मिडीया पोस्ट सध्या लक्षवेधी ठरतेय. 

जेनेलियाने रितेश देशमुखसोबतच्या तिच्या लग्नातला एक फोटो शेयर केला आहे. यात तिचे सासरे विलासराव देशमुख तिला घट्ट मिठी मारताना दिसत आहेत. जणू ही बाप लेकीची मिठी असावी असा हा फोटो  आहे. हा फोटो शेयर करत जेनेलियाने एक भावुक पोस्ट लिहीली आहे.

ती लिहीते की, "प्रिय पप्पा, बऱ्याचदा सून जेव्हा तिच्या सासरी येते तेव्हा तिला भिती असते की तिचा कुटुंबाचा सदस्य म्हणून स्विकार होईल का. पण कुटुंब म्हणजे फक्त रक्ताचं नातं नसतं यावर माझा विश्वास ठेवण्यास तुम्ही मदत केली. हे नातं खूप शुद्ध, पवित्र आणि हवंसं वाटणार आहे. मला तुमचं संयम, प्रेमळपण आणि सगळ्यांसाठी असलेल्या विनाअटीच्या प्रेमाचा वारसा बनायचं आहे पप्पा. ही मिठी फक्त सासऱ्याची नसून ती वडीलांची आहे. कारण मागे मी पाहू शकतेय की माझे वडील निश्चिंत दिसत आहेत की त्यांच्या मुलीला त्यांनी सर्वोत्तम कुटुंबात पाठवलय. तुम्ही मोठ्या करारासारखे आहेत पप्पा आणि तुम्हाला हे माहिती नाही. मी दररोज ऐकते की कुणी अज्ञात मला आशीर्वाद देऊन जातं कारण तुम्ही त्यांच्या जीवनाला विविध पद्धतिने हातभार लावलाय हे मला समजतं. वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

 

याशिवाय रितेश देशमुखनेही वडीलांच्या जन्मदिनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिलाय. रितेशने वडीलांसोबतचा त्याच्या लहानपणीचा फोटो शेयर केला आहे. तो लिहीतो की, "दररोज तुमची आठवण काढणं हे सोपं आहे पण तुमच्या आठवणीत ह्रदयाला ज्या वेदना होतात त्या काही जात नाहीत. वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा. दररोज तुमची आठवण येते."

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive