27 जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा 'बेलबॉटम'

By  
on  

बेलबॉटम  हा अक्षय कुमारचा बहुचर्चित सिनेमा आता ओटीटीवर नाही तर थेट सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला  येतोय. अक्षयच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. करोना लॉकडाऊनंतर अनलॉकमध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणारा बेलबॉटम हा पहिला सिनेमा ठरेल. आधी हा सिनेमा डिस्नी प्लस हॉटस्टार, एमेझॉन प्राईम यांसारख्या डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल अशा चर्चा रंगल्या होत्या. त्या चर्चांना खुद्द अक्षय कुमारनेच आज सोशल मिडीयावरुन ही आनंदवार्ता शेअर करत पूर्णविराम दिला. 

अक्षय आणि सिनेमाचे निर्माते जॅकी भगनानी (पूजा एंटरटेनमेंट) आणि निखिल आडवाणी (एम्मे एंटरटेनमेंट) यांना बेलबॉटमच्या ओटीटी रिलीजसाठी चांगली डिल ऑफर झाल्याचं बोललं जात होतं. तसंच हा सिनेमा स्वातंत्र्यदिनी भेटीला येणार असल्याच्यासुध्दा फक्त अफवाच होत्या. अक्षयने आज सिनेमाची थेट रिलीज डेटच जाहीर केली. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

बेलबॉटम हा सिनेमा 80 च्या दशकांती ल कथानकावर आधारित आहे. या सिनेमात अक्षय एका गुप्तहेराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. हायजॅक झालेल्या एका भारतीय विमानातील 212 प्रवाशांच्या सुटकेसाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करताना पाहायला मिळेल.

अक्षय कुमारसोबतच बेलबॉटम या सिनेमात हुमा कुरेशी, वाणी कपूर, लारा दत्ता हे या सिनेमात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळतील. 

Recommended

Loading...
Share