अभिनेता पर्ल वी पूरीला 11 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर वसई कोर्टाने मंजूर केला जामिन

By  
on  

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी अटकेत असलेला प्रसिध्द टीव्ही अभिनेता पर्ल वी पुरी   याला जामीन मंजूर झाला आहे. वसई सत्र न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली. वसई न्यायालयाने त्याची 11 दिवसांच्या कोठडीनंतर जामिनावर सुटका केली आहे. पीडितेच्या वडिलांनी अभिनेता पर्ल पुरी विरोधात पोलिसात बलात्काराची तक्रार दिली होती. ‘नागिन’ मालिकेमुळे अभिनेता पर्ल प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला होता. 

पर्ल पुरीला 5 जून रोजी मुंबई पुलिसांनी बलात्कार प्रकरणी अटक केली होती. त्यावेळी त्याला 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. 11 जूनला झालेल्या सुनावणीत त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. मात्र मंगळवारी वसई सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केल्याचं वृत्त आहे.

Recommended

Loading...
Share