राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता संचारी विजय याचं अपघाती निधन

By  
on  

कन्नड अभिनेता संचारी विजय यांचं अपघाती निधन झालं आहे. ते 38 वर्षांचे होते. आपल्या बाइकवरून घरी येत असताना अचानक त्यांची बाइक घसरून मोठा अपघात घडला होता. शुक्रवारी रात्री हा अपघात घडला. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केलं होतं. अभिनेता संचारी विजयच्या निधनानंतर त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबीयांनी घेतला.

 

संचारी यांना नानू अवनाला अवलु' या सिनेमातील तृतीयपंथीय व्यक्तिच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याशिवाय त्यांच्य  'हरिवु' या सिनेमाने कन्नडमधील फिचर फिल्मसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. किलिंग वीरप्पन’ आणि ‘नाथीचरामी’ या  सिनेमातील त्यांच्या अभिनयाचंही कौतुक झालं होतं.

Recommended

Loading...
Share