अरबाज खानच्या विदेशी गर्लफ्रेंडने दिलं मराठीत उत्तर, पाहा हा Video

By  
on  

पत्नी मलायकासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेता अरबाज खानची लव्ह लाईफ बरीच चर्चेत आली. आपली विदेशी गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानीसोबत तो अनेकदा स्पॉट होऊ लागला. त्यानंतर दोघांनीसुध्दा आपली रिलेशनशिप कधीच नाकारली नाही. जॉर्जिया एक मॉडेल व अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर ती बरीच सक्रीय आहे आणि अनेकदा तिचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आताही जॉर्जियाचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ती चक्क मराठीत बोलताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर जॉर्जियाच्या याच व्हिडीओची चर्चा आहे.

आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी जॉर्जियानं Ask Me Anything सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये तिच्या चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले. यात एका चाहत्यानं जॉर्जियाला, 'तुला मराठी बोलता येते का?' असा प्रश्न विचारला. या चाहत्याला चक्क मराठीतून उत्तर देत जॉर्जियानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 'मला मराठी येत नाही पण मी शिकत आहे.' असं उत्तर तिनं या चाहत्याला दिलं. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये जॉर्जियाचे एवढे चांगले मराठी उच्चार ऐकून सगळेच थक्क झाले आहेत.

 

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर जॉर्जियानं अनेक गोष्टी शिकल्या आहेत. ती उत्तम हिंदी बोलते आणि त्यासोबतच तिची पंजाबी भाषेवरही चांगली पकड आहे. पण आता ती मराठी भाषाही शिकत असल्याचं तिच्या व्हायरल व्हिडीओमधून समोर आलं आहे. चाहत्यांना तिला आता मराठी सिनेमात पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  

लवकरच जॉर्जिया श्रेयस तळपदेसोबत 'वेलकम टू बजरंगपूर' या चित्रपटात दिसणार आहे.

Recommended

Loading...
Share