दिवाळी 2022 मध्ये सलमानचा भाईजान येणार प्रेक्षकांच्या भेटीला?

By  
on  

राधे नंतर सलमान कोणत्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो याची उत्सुकता सगळ्यांना आहे. 21 जुलैला सलमान फरहाद सामजीच्या आगामी सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्याची शक्यता आहे. भाईजान असं सलमानच्या आगामी प्रोजेक्टचं नाव आहे. सिनेमात पूजा हेगड़े, आयुष शर्मा, जहीर इकबाल आणि असीम रियाज दिसणार आहेत. प्रसिद्ध तामिळ सिनेमाचा हा सिनेमा रिमेक असणार आहे. 

या सिनेमाची कथा चार भावांवर आधारित आहे. त्यामुळेच या सिनेमाचं नाव भाईजान आहे. यात सलमान मोठ्या अविवाहित भावाच्या व्यक्तिरेखेत आहे. जो लग्न टाळत असतो. या सिनेमात पुजा हेगडे सलमानसोबत झळकणार आहे.

Recommended

Loading...
Share