ज्येष्ठ बंगाली अभिनेत्री स्वातिलेखा सेनगुप्ता यांचं निधन

By  
on  

बंगाली रंगभूमीशी जोडलेल्या अभिनेत्री स्वातिलेखा सेनगुप्ता यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने बंगाली कलासृष्टीवर शोककळा पसरली आहे. स्वातिलेखा या गेले काही दिवस किडनी विकाराने त्रस्त होत्या. अनेक कलाकारांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

रुद्रप्रसाद आणि स्वातिलेखा यांची एकुलती एक लेक सोहिनी देखील प्रसिद्ध कलाकार आहे. त्यांच्या अभिनयातील योगदानामुळे त्यांना  पश्चिम बंगा नाट्य अकादमी पुरस्कार आणि  संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारांनी सन्मानित केलं होतं.

Recommended

Loading...
Share