शिल्पा शेट्टी कुंद्रा म्हणते,''माझा नवरा राज सर्वगुणसंपन्न आहे, पण..."

By  
on  

या वीकएंडला सुपर डान्सर सत्र 4 मध्ये गायक कुमार सानूचे स्वागत करण्यात येणार आहे आणि त्याच्या गाण्यांचा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. 90च्या दशकातील त्याच्या गाजलेल्या गाण्यांवर स्पर्धक डान्स सादर करतील. कुमार सानू देखील आपली काही लोकप्रिय गाणी गुणगुणताना दिसेल आणि सर्वांना आठवणीच्या काळात घेऊन जाईल. हा वीकएंड डान्स, संगीत, मस्ती आणि रंजक किश्श्यांनी भरलेला असणार आहे. 
या भागात एक विश बाउलची गंमत असणार आहे, ज्यात शो मधील प्रत्येकाला आपल्या इच्छा पूर्ण झालेल्या दिसतील. टीव्हीवरची एक अत्यंत चंचल आणि चुणचुणीत परीक्षक शिल्पा शेट्टी हिने कुमार सानूकडे एक खास मागणी केली. या गाण्याची विनंती करताना तिने आपला पती राज कुंद्रा याच्याबद्दल एक गंमतीशीर किस्सा सांगितला. तिने कुमार सानूला ‘कभी हाँ कभी ना’ चित्रपटातील ‘वो तो है अलबेला’ गाणे म्हणण्याची विनंती केली, जे राज कुंद्राचे एक अत्यंत आवडते गाणे आहे.


 

तिने सांगितले, “राज अगदी सर्वगुणसंपन्न आहे, पण त्याला गाता येत नाही. माझ्या नवर्‍याने हे गाणे म्हणायला सुरुवात केली आणि मी हे पुरते ओळखले की, गाणे म्हणणे त्याचे काम नाही! त्यामुळे, मला आशा आहे की, हे गाणे खरे कसे म्हणायला हवे हे तो आज ऐकेल (हसते).”
कुमार सानू म्हणाला, “एका रियालिटी शोमध्ये मी ही गाणी पहिल्यांदाच म्हणत आहे.” आपल्या जबरदस्त आवाजाने त्याने सगळ्यांना भारून टाकले आणि शिल्पाची इच्छाही पूर्ण केली. हे गाणे म्हणून झाल्यानंतर कुमार सानू म्हणाला, “मी राज कुंद्राला कधीच भेटलेलो नाही. पण मी त्याला हेच सांगीन की, तो कितीही चांगला किंवा वाईट गायक असला तरी त्याला जेव्हा गरज असेल तेव्हा त्याला मदत करण्यास मी तत्पर आहे.”

 

बघा, सुपर डान्सर सत्र 4 शनि-रवी रात्री 8:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

Recommended

Loading...
Share