पाहा Video : एका दशकानंतर माधुरी दीक्षित आणि जावेद जाफ्री आले एकत्र, केला एकत्र डान्स

By  
on  

'डान्स दिवाने'च्या मंचावर एकापेक्षा एक नृत्य सादर केले जातात. या कार्यक्रमातील स्पर्धकांच्या परफॉर्मन्ससोबतच परिक्षक सौंदर्यवती, धकधक गर्ल माधुरीच्या नृत्याची अदाही कधी कधी पाहायला मिळते. या कार्यक्रमात येणारी पाहुणे मंडळीही या मंचावर थिरकताना दिसतात. मग त्यात माधुरीच्या डान्सचा तडकाही लागतोच. नुकतच या कार्यक्रमात पाहुणे म्हणून हजेरी लावली होती ती जावेद जाफ्री आणि नावेद जाफ्री या भावांनी. जावेद आणि नावेद यांनी यावेळी त्यांच्या डान्स कार्यक्रमाच्या आठवणींना उजाळा दिला. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

 

'100 डेज' या सिनेमात माधुरी आणि जावेद जाफ्री यांनी एकत्र काम केलं होतं. डान्स दिवानेच्या मंचावर या सिनेमाच्या आठवणींना माधुरी आणि जावेद यांनी उजाळा दिला. मात्र दोघं एकत्र असताना मग डान्सची फरमाइश करण्यात आली. यावेळी माधुरी आणि जावेद मंचावर एकत्र थिरकताना दिसले. 

90च्या दशकातील त्यांच्या या सिनेमातील लोकप्रिय गाण्यावर माधुरी आणि जावेद यांनी ठेका धरला. दोघांना एकत्र डान्स करताना पाहुन सारेच थक्क झाले. दोघांच्या या परफॉर्मन्सनी सगळ्यांचं लक्ष वेधलं.

जावेद जाफ्री याची उत्तम अभिनेत्यासह उत्तम डान्सर म्हणून खास ओळख आहे. 'मेरी जंग' या सिनेमात त्याने दाखवलेला डान्स परफॉर्मन्स त्या काळी चांगलाच गाजला होता. 'बोल बेबी बोल' या गाण्यावर जावेद जाफ्रीने केलेले नृत्य पाहुन तरुणाई भारावुन गेली होती. 

Recommended

Loading...
Share