अंडरटेकरने अक्षय कुमारला दिलं ख-या फाईटचं चॅलेंज, अक्षयने दिली ही मजेशीर प्रतिक्रिया

By  
on  

अभिनेता अक्षय कुमारने आपल्या करिअरच्या सुरुवातीला अनेक अ‍ॅक्शन सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यापैकीच एक सिनेमा म्हणजे  ‘खिलाडीयो का खिलाडी. हा सिनेमा रिलीज होऊन नुकतीच 25 वर्षं पुर्ण झाली आहेत. या सिनेमातील एका अॅक्शन सीनची त्यावेळी चर्चा होती. या सीनमध्ये अक्षय आणि डब्लूडब्लूईमधील खिलाडी द अंडरटेकर यांच्यामध्ये फाईट दाखवण्यात आली होती. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

पण या सीनमध्ये खरा अंडरटेकर नव्हता तर  बायन लीने द अंडरटेकरची भूमिका साकारली होती. अक्षयने या संदर्भात पोस्ट करुन सांगितलं होतं. अक्षयने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो कोलाज शेअर केले आहे. यामध्ये त्याने तुम्ही कधी अंडरटेकरला हरवले असेल तर हात वर करा असे म्हटले आहे. यामध्ये अक्षयने स्वत:चा फोटो वापरला आहे. अक्षय कुमारची ही पोस्ट पाहून खऱ्याखुऱ्या अंडरटेकरने कमेंट करत अक्षयला आव्हान केले आहे.

 

‘जेव्हा खऱ्या मॅचसाठी तयार होशील तेव्हा सांग’ असं अंडरटेकरने म्हटलं आहे. त्यावर अक्षयने हटके अंदाजात उत्तर दिलं आहे. ‘ब्रो, मला माझा इंश्युरन्स चेक करु दे आणि मग सांगतो’ अशी कमेंट अक्षयने केली आहे.

Recommended

Loading...
Share