अक्षय कुमारने त्याचा आगामी रक्षाबंधन सिनेमा बहिण अलकाला केला समर्पित

By  
on  

अक्षय कुमारने आजपासून आगामी सिनेमा ‘रक्षाबंधन’चं शुटिंग सुरु केलं आहे. अक्षय कुमार सोबत भूमी पेडणेकर या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सहेजमिन कौर, दिपिका खन्ना, सादिया खतीब आणि स्मृती श्रीकांत या अभिनेत्री अक्षयच्या बहिणींच्या भूमिकेत दिसणार आहेत. अक्षय या सेटवरुन एक फोटो शेअर केला आहे. यात अक्षय दिग्दर्शक आनंद राय यांच्यासोबत चर्चा करताना दिसत आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

 अलका हिरानंदानी आणि आनंद एल राय यांच्या सहकार्याने या सिनेमाचे सादरीकरण आणि वितरण झी स्टुडिओज द्वारा करण्यात येणार आहे. हिमांशु शर्मा आणि कनिका ढिल्लन लिखित , आनंद एल राय द्वारा दिग्दर्शित, रक्षाबंधन ही फिल्म केप ऑफ गुड फिल्म्स असोसिएशन सह कलर यलो प्रॉडक्शन ची फिल्म आहे.

 आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती देताना अक्षय कुमार म्हणाला कि, "जेव्हा मी आणि माझी बहीण अलका मोठे होत होतो तेव्हा ती माझी पहिली फ्रेंड होती. आणि ती आमची अगदी नैसर्गिक मैत्री होती.आनंद एल राय यांचा "रक्षाबंधन" हा चित्रपट तिला समर्पित आहे आणि आमच्या त्या विशेष नात्याचा उत्सव आहे. आज शूटिंगच्या पहिल्या दिवशी आपल्या प्रेमाची आणि शुभेच्छांची गरज आहे "

Recommended

Loading...
Share