By  
on  

पाहा Video : समीर विद्वांसच्या पहिल्या हिंदी सिनेमाचं नाव 'सत्यनारायण की कथा', कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक समीर विद्वांस लवकरच हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याचं बोललं जात होतं. यावर आता शिक्कामोर्तब झाला असून या सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. समीर विद्वांस यांच्या पहिल्या वहिल्या हिंदी सिनेमाचं नाव आहे 'सत्यनारायण की कथा'. बॉलिवुड स्टार कार्तिक आर्यन या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 

नुकतच समीर विद्वांससह कार्तिक आर्यनने या नव्या सिनेमाची घोषणा सोशल मिडीयावर केली आहे. या सिनेमाच्या नावाचा खुलासा करत ही खास गुड न्यूज कार्तिकने त्याच्या चाहत्यांना दिली आहे. साजिद नाडियाडवालाच्या या सिनेमातून दिग्दर्शक समीर विद्वांस हिंदी दिग्दर्शनात डेब्यू करत आहेत. 

 

 आत्तापर्यंत उत्तमोत्तम मराठी सिनेमांचं दिग्दर्शन केलेल्या समीर विद्वांसचा हा हिंदी सिनेमा कसा असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. समीरने नुकतच सोशल मिडीयावर पोस्ट करून या सिनेमाची घोषणा केली आहे. यात त्याने लिहीलय की, "आज एका नवीन प्रवासाला सुरूवात होत्ये.. तुम्हा सगळ्यांचं प्रेम आणि सोबत अशीच सदैव राहूद्या! आपल्या फक्त प्रेम आवश्यक आहे. दोन आत्म्यांची कथा."

समीर यांच्या 'आनंदी गोपाळ' या सिनेमावर पुरस्कारांचा वर्षाव झाला होता. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'समांतर 2' या वेबसिरीजचही समीरने दिग्दर्शन केलय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive