आमिर खान आणि किरण रावने घेतला घटस्फोटाचा निर्णय, लग्नाच्या 15 वर्षांनंतर होत आहेत वेगळे

By  
on  

बॉलीवुड जगतातून एक मोठी बातमी सध्या समोर आली आहे ज्याने सगळ्यांनाच धक्का बसलाय. अभिनेता आमिर खान आणि पत्नी किरण राव हे घटस्फोट घेत आहेत. नुकतच याविषयीचं दोघांचं स्टेटमेंट प्रदर्शित करण्यात आलय. 28 डिसेंबर 2005 मध्ये आमिरने किरण रावसोबत दुसरं लग्न केलं होतं. लग्नानंतर दोघांनी काही सिनेमेही एकत्र बनवले होते. मात्र आता त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने बॉलीवुडसह त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसलाय. 2002 मध्ये आमिरने त्याची पहिली पत्नी रीना दत्तासोबत घटस्फोट घेतला होता. त्यानंतर किरण राव आमिरच्या आयुष्यात आली होती.

आमिर आणि किरण यांच्या लग्नाच्या 15 वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेत आहेत. दोघांनी नुकत्याच दिलेल्या एका जॉइंट स्टेटमेंटमध्ये याविषय़ी खुलासा करण्यात आलाय.

या स्टेटमेंटमध्ये लिहीण्यात आलय की, "या 15 वर्षांमध्ये आम्ही एकत्र जीवनातील अनुभव, आनंद शेयर केला आहे. आमचं नातं हे विश्वास, सन्मान आणि प्रेमाने वाढला आहे. आता आम्हाला जीवनात एक नवी सुरुवात करायची आहे. पति-पत्नीच्या रुपात नाही तर सह आई-वडील आणि परिवाराच्या रुपात. काही काळापूर्वी आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता याला अधिकृत रुप देत आहोत. आम्ही दोगं वेगळे राहत असलो तरी आमच्या जीवनाला विस्तारीत कुटुंबासारखे शेयर करु. आम्ही आमचा मुलगा आझादसाठी समर्पित आई-वडील आहोत. ज्याचं पालन-पोषण आम्ही दोघं मिळून करु. आम्ही फिल्म्स, पानी फाऊंडेशन आणि इतर योजनांसाठी सहयोगी म्हणून काम सुरुच ठेवू. ज्याविषयी आम्ही मनापासून काळजी करतो. आमच्या नात्याला मिळणारं समर्थन आणि समजुतपणा यासाठी आमचा परिवार आणि मित्रमंडळींचे खूप खूप आभारी आहोत ज्यांच्याशिवाय आम्हाला हे पाऊल उचलण्यात सुरक्षित वाटू शकतय. आम्ही आमच्या हितचिंतकांकडून आशिर्वाद आणि शुभेच्छांची अपेक्षा करतोय. या घटस्फोटाला तुम्ही शेवट नाही तर आमच्यासारखं एका नव्या वाटचालीच्या सुरुवातीसारखं बघाल. धन्यवाद आणि प्रेम, किरण आणि आमिर."

Recommended

Loading...
Share