By  
on  

रणवीर सिंहच्या वाढदिवसाला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' ची घोषणा, करण जौहर दिग्दर्शित सिनेमात रणवीर-आलिया झळकणार एकत्र

आज रणवीर सिंहच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याशिवाय एक महत्त्वाची घोषणा त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आली आहे. ही घोषणा म्हणजे करण जौहर दिग्दर्शित आगामी सिनेमा. करण जौहरने त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' असं या सिनेमाचं नाव आहे. करण जौहर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. या सिनेमात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट एकत्र झळकणार आहेत. तेव्हा रणवीरच्या वाढदिवसानिमित्ताने चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे.शिवाय याच वर्षी 31 जानेवारी रोजी पीपिंगमन ने सांगितलं होतं की रणवीर सिंह आणि आलिया भट्ट 'गली बॉय' या सिनेमानंतर पुन्हा एकत्र झळकणार आहेत. 

नुकतच करण जौहरने तो दिग्दर्शनात पुनरागमन करणार असल्याचं सोशल मिडीयाच्या माध्यमातून सांगितलं होतं. आणि आता थेट आगामी सिनेमाचीच घोषणा करणने केली आहे. या सिनेमातून करण तब्बल 5 वर्षांनी दिग्दर्शनात पुनरागमन करतोय. 'कुछ कुछ होता' है या सिनेमातून करण जौहरने दिग्दर्शनाची सुरुवात केली होती. त्यानंतर सुरु झालेला करणचा प्रवास आणि एकामागोमाग एक हिट सिनेमे करण जौहरने दिले आहेत. 'ए दिल है मुश्किल' या सिनेमानंतर आता करण पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसतोय.

करणने आगामी सिनेमा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' ची घोषणा करत टायटल व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रदर्शित केला आहे. करण या पोस्टमध्ये लिहीतो की, "माझ्या आवडत्या लोकांसमोर पुन्हा लेन्सच्या मागे जाण्यासाठी उत्सुक आहे. सादर करत आहे रॉकी और रानी की प्रेम कहानी. रणवीर सिंह आणि आलिया भट्ट शिवाय कुणीही नाही. आणि इशिता मोइत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय द्वारे लिखित."

बॉलीवुड हंगामाच्या रिपोर्टनुसार 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मध्ये रणवीर सिंह आणि आलिया भट्ट शिवाय धम्रेंद, शबाना आजमी आणि जया बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत असतील. एका सूत्रानी सांगितल्यानुसार या सिनेमात धम्रेंद्र आणि शबाना आजमी हे आलिया भट्टच्या आजी-आजोबांच्या भूमिकेत झळकणार आहेत. तर जया बच्चन या रणवीर सिंहच्या आजीच्या भूमिकेत दिसतील.

सूत्रांच्या माहितीनुसार या सिनेमाचं चित्रीकरण सप्टेंबर महिन्यात सुरु होणार आहे. 5 ते 6 महिन्यात हे शेड्युल पूर्ण करण्यात येईल. मागील एका वर्षात करणने दोन वेब एंथोलॉजी - 'लस्ट स्टोरीज' आणि 'घोस्ट स्टोरीज' च्या एका सेगमेंटचं दिग्दर्शन केल होतं. तो अक्षय कुमार आणि कतरिन कैफच्या 'सूर्यवंशी' आणि रणबीर कपूर - आलिया भट्टच्या 'ब्रम्हास्त्र'ची देखील निर्मिती करतोय.

तेव्हा 'गली बॉय'या सिनेमानंतर पुन्हा एकदा रणवीर सिंह आणि आलिया भट्टची केमिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. त्यात करण जौहरचं दिग्दर्शन असल्याने उत्कुता वाढली असणार यात शंका नाही. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive