By  
on  

'मीमी'च्या नव्या पोस्टरवर झळकली सई ताम्हणकर, पाहायला मिळाला सईचा हटके

अभिनेत्री सई ताम्हणकर मोठ्या कालावधीनंतर पुन्हा बॉलीवुडमध्ये झळकणार आहे. 'मीमी' या सिनेमातून ती हटेक भूमिका साकारताना दिसेल. लव्ह सोनिया, गजनी, हंटर आणि ब्लॅक अँड व्हाईट सारखे दमदार चित्रपट दिल्यानंतर सई आता 'मीमी' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच 'मीमी' चा नवा पोस्टर प्रदर्शित करण्यात आलाय. या पोस्टरवर सईचा अप्रतिम लूक पाहायला मिळतोय. 

आजवर विविध भूमिकांमध्ये दिसणारी सई या सिनेमातून पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेत दिसेल. विशेष म्हणजे ग्लॅमरस लुकमध्ये मोठ्या प्रमाणात दिसणारी सई या सिनेमाच्या पोस्टरवर नॉनग्लॅमरस रुपात दिसत आहे. या सिनेमात क्रिती सनॉन, पंकज त्रिपाठी, मनोज पाहवा आणि सुप्रिया पाठक या कलाकारांसोबत सई झळकणार आहे. दिनेश विजन निर्मित या सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलय. या नव्या पोस्टरवरील सईचा लुकपाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता अधीक वाढली आहे. सरोगेट आईवर हा सिनेमा आधारित असून येत्या 13 जुलैला या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होत असून सईची भूमिका त्या ट्रेलरमधूनही पाहायला मिळणार आहे. येत्या 30 जुलै रोही 'मीमी' हा सिनेमा जियो सिनेमा आणि नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. सईने नुकताच हा नवा पोस्टर तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर शेयर केला आहे. 

सई या पोस्टमध्ये लिहीते की, "या जुलैला अनपेक्षित ऑफर तिचं आयुष्य बदलेल, मीमी ट्रेलर 3 दिवसात डिलीव्हर करतोय. मीमी 30 जुलैला प्रदर्शित होतोय." 

 

आगामी काळात 'इंडिया लॉकडाऊन' या मधुर भांडारकर यांच्या सिनेमातही सई झळकणार आहे. शिवाय 'पाँडीचेरी', 'कलरफुल' या मराठी सिनेमांमधूनही सई प्रेक्षकांच्या भेटीला येईल. नुकत्यात प्रदर्शित झालेल्या 'समांतर 2' या सिरीजमधून सईने दोन वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांना चकीत केलं आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive