पवित्र रिश्ता 2.0 च्या सेटवरील फोटो आले समोर, नेटिझन्स म्हणतात........

By  
on  

बहुप्रतिक्षित पवित्र रिश्ता 2.0 च्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. या मालिकेच्या घोषणेपासूनच तिची चर्चा सुरु होती. या मालिकेच्या पहिल्या सीझनने  प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. मालिकेची कथा, विविध भूमिका मध्यमवर्गीय कुटुंबांना त्यांच्याच घरातील एक भाग वाटू लागल्या होत्या. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ALTBalaji (@altbalaji)

 

आता या मालिकेत शाहीर शेख मानवच्या तर अंकिता लोखंडे पुन्हा एकदा अर्चनाच्या भूमिकेत झळकणार आहे. या मालिकेच्य सेटवरुन काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये शाहीर आणि अंकिता लोखंडे सोबत ऊषा नाडकर्णी आणि रणदीप राय दिसत आहेत.  या पोस्टला कधीकधी सामान्य जीवनात, आपल्याला सर्वात विलक्षण प्रेमकथा आढळतात. मानव आणि अर्चनाची विलक्षण प्रेमकथा; चित्रीकरण सुरू…..अल्ट बालाजीवर लवकरच” हे कॅप्शन दिलं आहे. या फोटोंचं नेटिझन्सनी स्वागत केलं आहे. मालिका पाहताना सुशांतची आठवण सतावेल हे देखील अनेक चाहत्यांनी म्हटलं आहे.

Recommended

Loading...
Share