गायक लकी अली यांनी घेतली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट

By  
on  

बॉलिवूडचे प्रसिध्द गायक आणि गीतकार लकी अलीकडेच त्यांच्या म्युझिक अल्बममुळे प्रकाशझोतात आले. आता नुकतीच त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.  
 

या ग्रेट-भेटीदरम्यानचे काही फोटो शेअर करत लकी अली यांनी आनंद व्यक्त केला आहे. लकी अली या भेटीदरम्यान आपल्या पोस्टमध्ये लिहतात, “मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजींना भेटण्याचं भाग्य लाभलं. आम्ही दोघांनीसुध्दा एक कलाकार म्हणून छान गप्पा मारल्या. उध्दवजींनी फोटोग्राफी विषयावरसुध्दा दिलखुलास बातचित केली. त्यांचा मुलगा आदित्य तर मला कारपर्यंत सोडायला आला. त्याने मला कारचं दार उघडून दिलं तेव्हा मला समजलं वडिलधा-यांशी कसं वागायचं ह्याचे संस्कार त्याच्यात बालपणापासूनच रुजले आहेत. “

 

 

Recommended

Loading...
Share