सुफी गायक मनमीत सिंगचं निधन, ढगफुटीमुळे झाले होते बेपत्ता

By  
on  

धरमशाला- ढगफुटीनंतर बेपत्ता झालेले सूफी गायक मनमीत सिंग यांचा मृतदेह अखेर सापडला. मनमीत यांच्या मृत्यूच्या बातमीने कुटुंबीय आणि चाहते यांना मोठा धक्का बसला आहे. मनमीत यांच्या मृत्यूमुळे 'सैन ब्रदर्स' (Sain Brothers) ची जोडीही फुटली. ते प्रसिध्द सुफी गायक होते. देश विदेशात त्यांच्या सैन ब्रदर्सचे अनेक लोकप्रिय शोज् पार पडत.   त्यांच्या जाण्याने संगीतविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. 

मनमीत पंजाबच्या अमृतसरमधील रहिवासी होते. 'दुनियादारी' या गाण्याने त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली. मंगळवारी संध्याकाळी उशिरा कांग्रा येथील करेरी तलावाजवळील एका खड्ड्यात मनमीत यांचा मृतदेह सापडला.

Recommended

Loading...
Share