दोन महिन्यांपुर्वी जन्म होऊनही दियाचं बाळ अजूनही घरी येऊ शकलं नाही

By  
on  

दिया मिर्झाने मागील दोन महिन्यापुर्वी बाळाला जन्म दिला आहे. काही वेळापुर्वी तिने बाळाचा फोटो शेअर करत ही महिती शेअर केली आहे. यासोबतच तिने आणि वैभवने त्यांच्या मुलाचं नाव अव्यान आझाद रेखी असं ठेवलं आहे. यावेळी पोस्टच्या कॅप्शनमध्ये दिया म्हणते, ‘आमचं काळीज असेल्या आमच्या मुलाचा अव्यान आझादचा जन्म १४ मेला झाला. तो लवकर या जगात आला. त्यानंतर आमचा हा चिमुकला मुलगा आयसीयूमध्ये नर्स आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे’. 

 

 

अपल्या प्रीमॅच्युअर डिलीव्हरीचं कारण सांगताना दिया म्हणते, ‘मला गरोदरपणात अचानक अ‍ॅपेंडेक्टॉमी आणि गंभीररित्या बॅक्टेरियल इंफेक्शन झालं. हे जीवघेण ठरू शकलं असतं. नशीबाने आमच्या डॉक्टरांनी वेळेत काळजी घेत सी-सेक्शन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अव्यान आझादचा जन्म सुरक्षितरित्या होवू शकला. यासोबतच तिने चाहत्यांच्या प्रेमासाठी आभार मानले आहेत. याशिवाय तिने अव्यान लवकरच घरी येणार असून त्याचे आजी-आजोबा, त्याची मोठी बहिण समायरा त्याला कुशीत घेण्यासाठी आतुरलेले असल्याचंही सांगितलं आहे.

Recommended

Loading...
Share