या अभिनेत्याचं किल्ल्यावर बर्थ डे सेलिब्रेशन, दुर्गप्रेमींचा संताप

By  
on  

हिंदी मालिकेमध्ये झळकलेला अभिनेता अंशुमन मल्होत्राला सध्या चांगलंच ट्रोल केलं जात आहे. करोना निर्बंध असतानाही अंशुमनने त्याचा वाढदिवस सुधागड येथील किल्ल्यावर साजरा केला असून मैत्रिणीसोबतचे काही आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर शेअर  केले आहेत. 

 

हे फोटो व्हायरल होताच दुर्गप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. यामध्ये एका फोटोत तो मैत्रिणीला किस करतो आहे. या फोटोवरून त्यावर टिका होत आहे. एकीकडे काही नेटिझन्स त्याला ट्रोल करत आहेत तर काही पाठिंबाही देत आहेत. तर अनेकांनी त्याच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

 

Recommended

Loading...
Share