By  
on  

घटस्फोटानंतर किरण रावसोबत लडाखमध्ये डान्स करताना आमिर खानचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

 बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांचा ताही दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला. त्यांचा 15 वर्षांचा संसार होता. दोघांनी अधिकृत घोषणा करत आपण वेगळे झाल्याचं सर्वांना कळवलं. आमिरचं हे दुसरं लग्न होतं. त्याने यातूनही काडीमोड घेतला. अनेकांना त्याच्या घटस्फोटामुळे धक्का बसला होता. आता आमिर आणि किरणचा घटस्फोटानंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते दोघेही डान्स करताना दिसत आहेत.

 

आमिरचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ आमिरच्या फॅन क्लबने शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये आमिर आणि किरण डान्स करत असल्याचे पाहायला मिळतायत. आमिर आणि किरण लोकप्रिय लडाखी नृत्य ‘गोम्बा सुमशाक’ वर थिरकत आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive