By  
on  

करिना कपूरने पहिल्यांदाच शेअर केली छोट्या नवाबाची पहिली झलक

अभिनेत्री करिना कपूर यावर्षी दुस-यांदा आई बनली. अभिनेत्री करिना कपूरने 21 फेब्रुवारीला ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये दुस-या बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर इतके दिवस करिना आणि सैफने छोट्या नवाबाला इतक्यातच कॅमेरासमोर न आणण्याचा निर्णय घेतला होता. 

 

 

पण करिनाने नुकतीच छोट्या नवाबाची पहिली झलक शेअर केली आहे. करिनाने जेहसोबतचा पहिला फोटो शेअर केला आहे. जवळपास पाच महिन्यांनी पहिल्यांदाच करिनाने धाकट्या लेकाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत करिना जेहच्या कपाळावर किस करताना दिसते आहे. हा फोटोपाहून चाहत्यांनी जेह तैमूर इतकाच क्युट असल्याचं म्हटलं आहे. करिनाच्या फॅनपेजवर हा फोटो शेअर केला गेला आहे. करिनाने काही दिवसांपुर्वीच ‘करिना कपूर खान्स प्रेग्नंसी बायबल’ या पुस्तकातून तिचा अनुभव शेअर केला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive